न पाठवलेल पत्र

आता मी काय तुला इच्छा असून ही 'प्रिय' अस म्हणु शकत नाही कदाचित तुला ते आवडणार पण नाही.
           असो पत्र लिहिण्यास कारण की मला अजून पण तुझी आठवण येतच आहे. कारण मी कधी तुला विसरायचा प्रयत्न केलाच नाही, उलट तुझ्या आठवणी वर जगत आहे अस म्हणल तरी अतिशयोक्ती नाही होणार, आणि काय म्हणुन माझ्या जीवन पुस्तकातील सर्वात सुंदर पानांना मी विसरू?
सर्वांच्या आयुष्यात चढउतार असतातच की, आणि तू माझा आयुष्यातील तो सुंदर काळ आहेस जो आता परत येणारच नाही, आणि येणार तरी कसा? मी काय फार यशस्वी पुरुष नाहीच मुळी जो तुझा सारख्या अस्मानी सौंदर्य असणार्‍या मुलींना 'सुयोग्य' असतो.
Sorry! इंग्लिश मध्ये 'Eligible' असतो, च्यायला! ही eligibility, योग्यता हे शब्द मला फार भयंकर आणि परके पण वाटतात. आणी 'you are not eligible!,' अयोग्य आणि सरळ सरळ ना - लायक, हे कस सारख ऐकल्या सारख वाटत एकदम जवळच, आपल्या बद्दल कोणी तरी बोलत आहे इतकी आपुलकी वाटते मला तर.
     असो तर मुद्दा हा होता की सामाजिक नियमानुसार मी काय तुझा साठी Eligible वैगेरे नव्हतो आणि आता पण नाही. त्यामुळे मी काय पर्मनंट /कायम सेवेत रुजू होऊ शकलो नाही, इच्छा असून ही!  (same too गम्मत म्हणजे मी कुठे जॉब मध्ये पण पर्मनंट झालो नाही कारण एकच eligibility), देव ही eligibility नावाच रसायन वाटताना मी कुठे गेलो होतो काय माहीत? का तिथ पण non-eligible म्हणुन मला हिसकावून लावले असेल नक्कीच!
        मला एकच सांगायच आहे तुला माझा मनातलं, जे मी समोरासमोर नाही बोलू शकलो. थोड लांबलचक आहे तरी शेवट पर्यंत वाच आणि लक्षात पण ठेव.
              तुझ माझ्यावर आणि माझ तुझा वर जिवापाड प्रेम होत त्या काळात कधीच नव्हत हे असल eligible च खूळ! तू कधीच मला कमी लेखल नाही अगदी कस समांतर होत सगळ हलक-भारी, काळ-गोर, गरीब-श्रीमंत, जात-पात असल काहीच नव्हत आपल्या त्या जगात.
मला तुझा स्कूटी वर मागे बसायला कधी काही नाही वाटल, ना तुला माझा सोबत चालत जायला, ना एक प्लेट पाणीपुरीत दोघे आणि वरून 'और एक सुखी पूरी दो ना भैया' मागायला.
मग मधेच कुठून आले हे सामाजिक नियम आणि ते 'hated words.' कोण ठरवत हे? आणि आपल्याला कस बर माहीत नव्हत हे सगळं, असत माहीत तर कधी कोणीच प्रेम केल नसत, आणि नंतर रडत बसायची वेळ आली नसती, त्यामुळे हे सांगायला पाहिजे सर्वाना पुढचा न भरून येणारा त्रास होणार नाही कदाचित.
              'जाऊ दे आपल्याला काय करायचंय!' हे तुझ बिनधास्त बोलण कायम नाही का होणार? 
     मला काय माहीत नाही पण पुढचा जन्मा मध्ये मला तूच पाहिजेस temporary साठी eligible आहे तर कायम साठी का नाही? तुला आठवत नसेल कदाचित आपले 6 जन्म झाले आहेत आणि पुढचा शेवटचा असेल. आणि दर जन्मा मध्ये मी हे same सांगतो तुला आणि दर वेळेस मी temporary असतो पण आता बस झाल please मला एकदा life मध्ये दे ना संधी जस तू सगळे नियम धुडकावून मला temporary select केलस तस.
  आता असह्य झाल आहे हे सगळ please म्हणत आहे तुला कारण माझ गणित कच्चे आहे त्यामुळे हा जन्म 6 वा आहे की 7 वा मी sure नाही.

तुझाच temporary,
Waiting for permanent in next life.